मिडिया'
मिडिया अर्थात माध्यम सध्याच्या युगात मीडिया चा भडीमार आहे, मीडिया म्हणजे बातमीपत्र, टीव्ही,रेडिओ,इंटरनेट कुठल्याही देशाच्या प्रगतीला मीडियाचा खूप मोठा हातभार असतो.
आज मीडिया मुळे लोकांना जागच्या जागी संपूर्ण जगाची खबरबात मिळते.
मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत काही लोक मीडिया चा गैरवापर सुद्धा करतात , टीव्ही वरील न्युज चॅनेल वर तर रात्री 9 ते 11 जे प्रोग्रॅम दाखवतात त्यात काय बघण्यासारखे असतं काहीच नाही हे न्युज चॅनेल वाले आपल्या trp साठी आणि पैसे च्या लालसेपोटी काहीही दाखवत सुटतात,
आता न्यूज पेपर च बघा पहिल्या पानावर नेहमीच खून,दरोडे बलात्कार अश्याच बातम्या असतात बाकी पानांवर फक्त जाहिराती , मुख्य बातम्या आदल्या मधल्या कुठल्यातरी पानावर एकाद्या कोपऱ्यात असणार.
खरतर पारदर्शी , सत्य बातम्या ज्याने लोकांमध्ये जनजागृती होईल असे काही तरी दाखविले पाहिजे.
इंटरनेट माध्यम तर सर्वात जलद आणि खूप फायद्याचे माध्यम आहे तिथे सुद्धा लोक त्याचा नको तास उलटसुलट वापर करत असतात,इंटरनेट चा जास्तीत जास्त वापर आपल्या देशाने करावा असे आवाहन खुद्द आपले प्रधानमंत्री सुद्धा करत असतात.
इंटरनेट मुळे आज आपण कानाकोपर्यातील आपल्या नातलगांशी , मित्रांशी face to face संवाद साधू लागलोय.
आपला "गरुडझेप" ग्रुप हा सुद्धा मीडिया चा एक अविभाज्य अंग आहे ह्या ग्रुप ने समाजात एक चांगली विचारशक्ती आणण्याचा प्रयत्न केलाय,ह्या ग्रुप ला tv, बातमीपत्र ह्या माध्यमांची सुद्धा छान साथ लाभली आहे.
मीडिया अशी ताकत आहे जिथे संत्री मंत्री सुद्धा आपले गुढगें टेकतात , मीडिया ने पल्स पोलियो आणि एड्स बाबत बातम्या दाखवून सतत समाजात ह्या आजाराबाबत सतत जनजागृती केली आहे.
Wednesday, 16 August 2017
"मीडिया"
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment