Monday, 14 August 2017

मानसिकता

चला,एकदाचा मुहूर्त सापडला !!!
काल गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जुगार खेळायला मुहूर्त सापडला.
तसे पाहता जुगार आम्ही गणपतीत खेळतो पण गणपती येण्याअगोदर एक सराव म्हणून कृष्णाजन्माष्टमीला सुरुवात करतो.
मग काय काल रात्री मस्त डाव बसला आमच्या बाजूच्या काकूंच्या धक्क्यावर रात्रभर आम्ही जुगार खेळलो .
जुगार खेळताना डाव सोडून उठता येत नाही म्हणून तिथेच धक्क्यावर आमच्या तोंडातील गुटका,तंबाखू च्या पिचकाऱ्या मारून मोकळे झालो,सकाळी शिव्या ऐकायला भेटतील ह्याची जाणीव असताना सुद्धा आम्ही थुकलो कारण आम्हाला जणांची,मनाची कुठलीच लाज शिल्लक राहीलेली नाही ती आम्ही केव्हाच विकून खाल्ली.
महत्वाचे राहूनच गेले आमची गणपतीची मीटिंग महिन्याभरपूर्वीच झाली वर्गणी सुद्धा ठरली,पण वर्गणी द्यायला पैसेच नाहीत हो.
हा आता जुगार खेळायला कसेतरी पैसे जमा केले ती गोष्ट वेगळी.
हरलो तर कारण आहेच वर्गणी न देण्याचे पण जिंकलो तर काय कारण देणार ?
जिंकल्यावर लगेचच कुठे वर्गणी द्यायची आहे सांगता येईल खर्च झाले पैसे.
खोट बोलायला आपलं काय जातंय अशी पण आपण जनाची, मनाची सर्व लाज विकून मोकळे झालोत.
(कुणाची जळत असेल तर जळू देत)

No comments:

Post a Comment