Monday, 7 August 2017

'संस्कार'

संस्कार'
'संस्कार' सध्या च्या युगात हा शब्द एकतर वाचनात येतो नाही तर ऐकण्यात येतो,
पूर्वी संस्कार मनुष्याच्या वागणुकी तुन दिसायचे पण आता मात्र फक्त वागणूक दिसतेय संस्कार मात्र कुठल्या कुठे गायब झालेत.
क्वचितच असे लोक सध्या आपल्या अवती भोवती दिसतात जे इतके छान वागतात की आपण लगेच बोलतो 'छान संस्कार झालेत ह्यांच्यावर' अन्यथा संस्काराची नुसतीच बोंब आहे.
संस्कार ना शाळेत शिकवले जात ना कॉलेज ला शिकवले जात , संस्कार हे घरातली मंडळी कसे वागतात ह्याच्यावर अवलंबून आहे,घरातील सदस्य जर संस्कारक्षम असतील तर मुलांना संस्कार शिकवण्याची गरजच नाही,मुले ते संस्कार आपोआप शिकतील कारण जे नजरेसमोर रोज रोज दिसत असेल ते कॉपी करणे ही मुलांची सवय आहे,त्यामुळे शक्य तो आपण चांगले वागलो आपल्यात चांगले संस्कार असतील तर ते मुलांमध्ये आपोआप येणार ह्यात काही शंका नाही.

No comments:

Post a Comment