Tuesday, 15 August 2017

बस वाहक

'स्वातंत्र्य' ह्या शब्दाचा खरा अर्थ काल समजला,
काल संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रूट वर चालणाऱ्या एका बस मध्ये आम्ही चढलो, 5 मिनिटात बस फुल्ल झाली आणि ड्राइवर ने बस जशी चालू केली तशी एक घोषणा कानावर पडली कोण घोषणा देतोय म्हणून बघितली तर बस वाहक होते ते.
त्यांची घोषणा पुढील प्रमाणे "बस मे सवार सभी यात्रींयो का स्वागत आप सभी स्वतंत्रता दिन की ढेर सारी शुभकामनये"
बस पुढे सरकत सरकत asiatic लायब्ररी जवळ आली असता दुसरी घोषणा "चलो किसे asiatic library उतरणा है उतरो,अपनी दायी और जो दिख रही है वो लायब्ररी आप को अकसर फिलमो मे कोर्ट के रूप मे दिखाई जाती है".
पुढच्या स्टॉप वर तर कमालच केली काय तर म्हणे "जीस किसीं को पैसा लुटना है डाका डा लना है इस स्टॉप पे उत्तरे इस स्टॉप जा नाम reserve bank of india है यह दायी ओर पैसा छापता है और बायी ओर बाटा जाता है"
पुढील स्टॉप वर फक्त "ये gpo office है" इतकाच आणि बस csmt ला डेपोत घुसताना "ये आया आपका अंतिम स्टॉप एक एक करके line से उतरिये और आप साभिका धन्यवाद जो आपने हमारे बस मे सफर कीया और उतरते हुये ड्राइवर जी को thank u बोलना न भुले , उनकी बदौलत हम अपने सही स्थान पे पहुचे, धन्यवाद."
खरच कालचा हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही best वाहक इतक्या छान प्रकारे आपल्या प्रवाशांशी वागू शकतात ह्या वर माझा विश्वासच नव्हता.

No comments:

Post a Comment