Wednesday, 16 August 2017

"मीडिया"

मिडिया'
मिडिया अर्थात माध्यम सध्याच्या युगात मीडिया चा भडीमार आहे, मीडिया म्हणजे बातमीपत्र, टीव्ही,रेडिओ,इंटरनेट कुठल्याही देशाच्या प्रगतीला मीडियाचा खूप मोठा हातभार असतो.
आज मीडिया मुळे लोकांना जागच्या जागी संपूर्ण जगाची खबरबात मिळते.
मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत काही लोक मीडिया चा गैरवापर सुद्धा करतात , टीव्ही वरील न्युज चॅनेल वर तर रात्री 9 ते 11 जे प्रोग्रॅम दाखवतात त्यात काय बघण्यासारखे असतं काहीच नाही हे न्युज चॅनेल वाले आपल्या trp साठी आणि पैसे च्या लालसेपोटी काहीही दाखवत सुटतात,
आता न्यूज पेपर च बघा पहिल्या पानावर नेहमीच खून,दरोडे बलात्कार अश्याच बातम्या असतात बाकी पानांवर फक्त जाहिराती , मुख्य बातम्या आदल्या मधल्या कुठल्यातरी पानावर एकाद्या कोपऱ्यात असणार.
खरतर पारदर्शी , सत्य बातम्या ज्याने लोकांमध्ये जनजागृती होईल असे काही तरी दाखविले पाहिजे.
इंटरनेट माध्यम तर सर्वात जलद आणि खूप फायद्याचे माध्यम आहे तिथे सुद्धा लोक त्याचा नको तास उलटसुलट वापर करत असतात,इंटरनेट चा जास्तीत जास्त वापर आपल्या देशाने करावा असे आवाहन खुद्द आपले प्रधानमंत्री सुद्धा करत असतात.
इंटरनेट मुळे आज आपण कानाकोपर्यातील आपल्या नातलगांशी , मित्रांशी face to face संवाद साधू लागलोय.
आपला "गरुडझेप" ग्रुप हा सुद्धा मीडिया चा एक अविभाज्य अंग आहे ह्या ग्रुप ने समाजात एक चांगली विचारशक्ती आणण्याचा प्रयत्न केलाय,ह्या ग्रुप ला tv, बातमीपत्र ह्या माध्यमांची सुद्धा छान साथ लाभली आहे.
मीडिया अशी ताकत आहे जिथे संत्री मंत्री सुद्धा आपले गुढगें टेकतात , मीडिया ने पल्स पोलियो आणि एड्स बाबत बातम्या दाखवून सतत समाजात ह्या आजाराबाबत सतत जनजागृती केली आहे.

Tuesday, 15 August 2017

बस वाहक

'स्वातंत्र्य' ह्या शब्दाचा खरा अर्थ काल समजला,
काल संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रूट वर चालणाऱ्या एका बस मध्ये आम्ही चढलो, 5 मिनिटात बस फुल्ल झाली आणि ड्राइवर ने बस जशी चालू केली तशी एक घोषणा कानावर पडली कोण घोषणा देतोय म्हणून बघितली तर बस वाहक होते ते.
त्यांची घोषणा पुढील प्रमाणे "बस मे सवार सभी यात्रींयो का स्वागत आप सभी स्वतंत्रता दिन की ढेर सारी शुभकामनये"
बस पुढे सरकत सरकत asiatic लायब्ररी जवळ आली असता दुसरी घोषणा "चलो किसे asiatic library उतरणा है उतरो,अपनी दायी और जो दिख रही है वो लायब्ररी आप को अकसर फिलमो मे कोर्ट के रूप मे दिखाई जाती है".
पुढच्या स्टॉप वर तर कमालच केली काय तर म्हणे "जीस किसीं को पैसा लुटना है डाका डा लना है इस स्टॉप पे उत्तरे इस स्टॉप जा नाम reserve bank of india है यह दायी ओर पैसा छापता है और बायी ओर बाटा जाता है"
पुढील स्टॉप वर फक्त "ये gpo office है" इतकाच आणि बस csmt ला डेपोत घुसताना "ये आया आपका अंतिम स्टॉप एक एक करके line से उतरिये और आप साभिका धन्यवाद जो आपने हमारे बस मे सफर कीया और उतरते हुये ड्राइवर जी को thank u बोलना न भुले , उनकी बदौलत हम अपने सही स्थान पे पहुचे, धन्यवाद."
खरच कालचा हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही best वाहक इतक्या छान प्रकारे आपल्या प्रवाशांशी वागू शकतात ह्या वर माझा विश्वासच नव्हता.

Monday, 14 August 2017

मानसिकता

चला,एकदाचा मुहूर्त सापडला !!!
काल गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जुगार खेळायला मुहूर्त सापडला.
तसे पाहता जुगार आम्ही गणपतीत खेळतो पण गणपती येण्याअगोदर एक सराव म्हणून कृष्णाजन्माष्टमीला सुरुवात करतो.
मग काय काल रात्री मस्त डाव बसला आमच्या बाजूच्या काकूंच्या धक्क्यावर रात्रभर आम्ही जुगार खेळलो .
जुगार खेळताना डाव सोडून उठता येत नाही म्हणून तिथेच धक्क्यावर आमच्या तोंडातील गुटका,तंबाखू च्या पिचकाऱ्या मारून मोकळे झालो,सकाळी शिव्या ऐकायला भेटतील ह्याची जाणीव असताना सुद्धा आम्ही थुकलो कारण आम्हाला जणांची,मनाची कुठलीच लाज शिल्लक राहीलेली नाही ती आम्ही केव्हाच विकून खाल्ली.
महत्वाचे राहूनच गेले आमची गणपतीची मीटिंग महिन्याभरपूर्वीच झाली वर्गणी सुद्धा ठरली,पण वर्गणी द्यायला पैसेच नाहीत हो.
हा आता जुगार खेळायला कसेतरी पैसे जमा केले ती गोष्ट वेगळी.
हरलो तर कारण आहेच वर्गणी न देण्याचे पण जिंकलो तर काय कारण देणार ?
जिंकल्यावर लगेचच कुठे वर्गणी द्यायची आहे सांगता येईल खर्च झाले पैसे.
खोट बोलायला आपलं काय जातंय अशी पण आपण जनाची, मनाची सर्व लाज विकून मोकळे झालोत.
(कुणाची जळत असेल तर जळू देत)

Wednesday, 9 August 2017

"अनुभव"

अनुभव"
एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'.
अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे की ती घटना चांगली होती की वाईट होती.
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक किंवा एखादी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या विरोधात वाईट अनुभव हा मनुष्याला नकारात्मक दृष्टिकोन देऊन वाईट वागायला प्रवृत्त करतो.
तरी सुद्धा सर्वस्वी आपल्या हातात आहे आपली वागणूक चांगली असल्यास आपण  कुठल्याही नकारात्मक गोष्टीला किंवा वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या नजरेने ते चांगले कसे करता येईल ह्या कडे कळ दिला पाहिजे.
कुठला ही व्यक्ती ही कधीच वाईट नसते , वाईट असतात ते त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवानुसार ते तसे वागत असतात.

Monday, 7 August 2017

'संस्कार'

संस्कार'
'संस्कार' सध्या च्या युगात हा शब्द एकतर वाचनात येतो नाही तर ऐकण्यात येतो,
पूर्वी संस्कार मनुष्याच्या वागणुकी तुन दिसायचे पण आता मात्र फक्त वागणूक दिसतेय संस्कार मात्र कुठल्या कुठे गायब झालेत.
क्वचितच असे लोक सध्या आपल्या अवती भोवती दिसतात जे इतके छान वागतात की आपण लगेच बोलतो 'छान संस्कार झालेत ह्यांच्यावर' अन्यथा संस्काराची नुसतीच बोंब आहे.
संस्कार ना शाळेत शिकवले जात ना कॉलेज ला शिकवले जात , संस्कार हे घरातली मंडळी कसे वागतात ह्याच्यावर अवलंबून आहे,घरातील सदस्य जर संस्कारक्षम असतील तर मुलांना संस्कार शिकवण्याची गरजच नाही,मुले ते संस्कार आपोआप शिकतील कारण जे नजरेसमोर रोज रोज दिसत असेल ते कॉपी करणे ही मुलांची सवय आहे,त्यामुळे शक्य तो आपण चांगले वागलो आपल्यात चांगले संस्कार असतील तर ते मुलांमध्ये आपोआप येणार ह्यात काही शंका नाही.

Saturday, 5 August 2017

कवी

प्रत्येकाची इच्छा असते काही तरी वेगळं करण्याची,
माझी ही इच्छा आहे लोकांना आवडेल असे लेखन करण्याची.
लिहिणे तसे सोपे नसते जसे मनात येते तसे पानावर उतरवणे अवघड असते,
तरीही प्रयत्न करावे ,लिहावे भरत जावी वही
काय भरवसा 'कवी' हे ब्रीद आपल्या ही नावास येई.
कुणास आवडे न आवडे मी मात्र लिहीत राहणार
एक दिवस नक्की माझे नाव 'कवी' म्हणून करून दाखवणार.
‌                                  योगेश.

Thursday, 3 August 2017

"सुधारणा"

सुधारणा'
सुधारणा सध्या काळाची गरज आहे कारण सध्या जे काही समाजात घडत आहे ते खुप स्वार्थ पणाच्या अप्पलपोटी पणाच्या गटात मोडत आहे.
जिकडे पहावे तिकडे भ्रष्टाचार चालू आहे
सुधारणा ही आपल्यात व्यवहारात , आपल्या समाजात, आपल्या राजकारणात आपल्या समाजाच्या प्रत्येक गटात झाली पाहिजे.
चांगल्या टक्केवारी ने उत्तीर्ण होऊन सुद्धा शाळा , कॉलेज मध्ये प्रवेश नाही मिळत तिथे प्रवेश मिळतो तो फक्त अमाप पैसा भरणाऱ्याला किंवा ज्यांचा वशिला असेल त्यांना.
महानगरपालिकेत तुमचे काही काम असेल तर तिथे सुद्धा जो पर्यंत पैसा आणि वशिला दाखवत नाहीत तो पर्यंत तुमचे काम होत नाही.
आता आपली मानसिकता, आपण अपघात ग्रस्थाना लवकरात लवकर दवाखान्यात नेण्याचे सोडून त्यांचे विडिओ चित्रीकरण करण्यात वेळ वाया घालवतो.
असे एक ना अनेक उदाहरणे आहेत जिथे 'सुधारणा' होणे खूप आवश्यक आहे.