जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती,
लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती.
साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती,
सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती.
प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती,
कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.
शाळेत असताना भीती,कॉलेजमध्ये ही भीती,
घरातही भीती समाजात वावरतानाही भीती.
लेखकांना ही भीती कवींनाही भीती,
लेखनावर कुणी आक्षेप घेईल म्हणून विचारांवर ही भीती.
समाज सुधारकास ही भीती,समाज कंटकास ही भीती,
आजारी पडताच रुग्णास ही भीती,ईलाज करताना डॉक्टरांनी ही भीती.
खोटे बोललो तरी भीती खरे बोललो तरी भीती,
कुणी दुरावू नये म्हणून भीती,कुणी जवळ येऊ नये म्हणूनही भीती.
मन हे कधीच स्थिर नसतं,प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं.
गुरुजनांनाही भीती विद्यार्थ्यांनाही भीती,
शिक्षणावर आपल्या कुणालाच नाही शाश्वती.
व्यापाऱ्यालाही भीती शेतकऱ्यालाही भीती,
पाऊस जास्त झाला तरी भीती,पाऊस नाही झाला तरी भीती.
वाईट प्रवृत्ती सर्वत्र,घोळक्यात ही भीती एकांतात ही भीती,
परक्यांकडूनही भीती,आपल्यांकडूनही भीती.
पुरुषास ही भीती स्त्री ला ही भीती,घरात भीती दारात भीती,
रस्त्यावर जावे तर तिकडेही भीती.
प्रत्येक मनास दोन बाजू असते,
एका बाजूस सकारात्मक यशाची खात्री,
तर दुसऱ्या बाजूस नकारात्मक अपयशाची भीती.
कोरोना काळात कुणाकडे जाण्यास ही भीती,कुणी आपल्याकडे येईल ह्याची ही भीती.
मास्क लावले तरी भीती,वारंवार हात धुवुनही भीती,
खूप काळजी घेत सुरक्षित सामाजिक अंतर राखूनही भीती.
कोरोना आजार भयंकर पूर्ण इलाजाची खात्री नाही पण निदान आहे,तर त्या निदानाची ही भीती.
लस न घेतल्यास ही भीती तर लस घेऊनही पुन्हा आजारी पडतात म्हणून त्या लसी ची ही भीती.
Saturday, 15 May 2021
भीती प्रत्येकालाच असते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment