Monday, 29 March 2021

असा ही शिमगा

आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो,
होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो.
होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते,
झाल्या बोंबा मारून की मग
सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.
बैठकीतच एकमेकांची पार वाट लावली जाती,
राग येऊन मग होळी जवळ येऊन चौकात पावर दाखवली जाते.
काही वेळ निघून जाते वातावरण शांत व्हायचे सोडून अजून बिघडले असते.
इतका धिंगाणा असूनही कुणी मध्ये येत नाही,
कारण त्या वेळेस झिंग इतकी असते की मध्ये गेलेल्याची खैर नसते.
रात्र वाढत जाते तसे राडे ही वाढतात,
एकमेकांचे कपडे फाडून धुळवडीचा आनंद लुटतात.
भेटेल जो नवा त्याला त्रास दिला जातो,
अध्यात ना मध्यात असणाऱ्याला ही आवाज दिला जातो.
कमी पडतो स्टॉक ह्याची जाणीव होताच रात्री ही त्याची व्यवस्था होते,
सकाळ पर्यंत कित्येक भांडणे होते, दिवस उजाडतो तेव्हा झोपले जाते.
दुपार होते तेव्हा जाग येते खरी धुळवड आज आहे हे ही लक्षात येते,
निघतो मग आम्ही चौकात धुळवड खेळायला,
रात्रीचे सारे वाद तंटे विसरून गळे मिळायला.
आमची होळी धुळवड अशी साजरी होते,
कितीही राडे झाले तरी पुन्हा गोड बोलत एकता होते.

No comments:

Post a Comment