Friday, 20 July 2018

तुझ्याशी बोलणे

तुझ्याशी कितीही बोललो तरी कमीच वाटते
Bye बोलल्यानंतर ही तु अजून थोडा वेळ थांबावीस असे वाटते.

कोण ती ?

बरेच जण विचारतात
कोण आहे ती ?
जिच्यावर तू एवढे status बनवतो.
मी मात्र सहजच हसत बोलतो
ते नाव प्रत्येकाच्या ओठावर चांगले नाही वाटत.

बहाणा

काहीतरी बहाणा करून
तुमच्याशी बोलायला
मला खूप आवडतं.
विनाकारण तुमच्या समोरून
जायला आणि जाता-जाता हळूच तुम्हाला बघायला
मला खूप आवडतं.
तुम्ही समोर नसतानाही
तुमच्या आठवणीत हरवून रहायला
मला खूप आवडतं.

नाही सांगू शकत

हाल माझ्या हृदयाची,

मी तुम्हाला सांगू  नाही शकत ,

जे विचार करत असतो सतत,

 ओठांवर आणू नाही शकत,

खरच खूप प्रेम आहे, 

तुमच्या साठी माझ्या ह्या हृदयात,
पण कुणास ठाऊक का ?
मी तुम्हाला सांगू नाही शकत