बहुत सोचता रहा
पर खूबसुरत शब्द ही नही मिले
उनकी तारीफ मे,
चाहे पुरी दुनिया घुम लो
उनसे खूबसुरत कोई नही मिलेगा
आज की तारीख मे.
Friday, 7 September 2018
खूबसुरत
Thursday, 6 September 2018
माझी शाळा
खूप आवडते मला माझी शाळा,
वर्गात माझ्या भिंतीवर मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या मोठी बाग,
गुरुजी नेहमी म्हणे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येतो मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला मैदान मोठ्ठा फार,
मुकतो आम्ही जेव्हा असतो सुट्टीचा रविवार.
खेळतो आम्ही एकत्र जेव्हा होते मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडतो नि पुन्हा कट्टी-बट्टी.
Friday, 20 July 2018
तुझ्याशी बोलणे
तुझ्याशी कितीही बोललो तरी कमीच वाटते
Bye बोलल्यानंतर ही तु अजून थोडा वेळ थांबावीस असे वाटते.
कोण ती ?
बरेच जण विचारतात
कोण आहे ती ?
जिच्यावर तू एवढे status बनवतो.
मी मात्र सहजच हसत बोलतो
ते नाव प्रत्येकाच्या ओठावर चांगले नाही वाटत.
बहाणा
काहीतरी बहाणा करून
तुमच्याशी बोलायला
मला खूप आवडतं.
विनाकारण तुमच्या समोरून
जायला आणि जाता-जाता हळूच तुम्हाला बघायला
मला खूप आवडतं.
तुम्ही समोर नसतानाही
तुमच्या आठवणीत हरवून रहायला
मला खूप आवडतं.
नाही सांगू शकत
हाल माझ्या हृदयाची,
मी तुम्हाला सांगू नाही शकत ,
जे विचार करत असतो सतत,
ओठांवर आणू नाही शकत,
खरच खूप प्रेम आहे,
तुमच्या साठी माझ्या ह्या हृदयात,
पण कुणास ठाऊक का ?
मी तुम्हाला सांगू नाही शकत…