Saturday, 28 December 2019

रविवार

रविवार !!
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे.

No comments:

Post a Comment