खरे आहे, जन्मलो तर मृत्यू हा येणारच,
खूप जगलो जीवन,आता परतुनी जाणारच,
निघायची वेळ झाली,पाठीशी सुख-दुःखाचे अनुभव घेऊनी,
नाही आठवत,काय कमावले नि काय गमावले ह्या जीवनी,
प्रेमाने वागलो,सर्वांशीस नाते जोडले
जे काही जमवलं ते मागेच सोडले.
श्वास थांबला जीवन यात्रा संपली,
सर्व काही मागे ठेवुनी
निघण्याची वेळ झाली.
No comments:
Post a Comment