आजचा प्रश्न
"तुम्ही मुलांना मोठे केल्यावर काय बनवणार" ?
मी तर शक्य तेवढे मुल्लींना शिकवण्याचा प्रयत्न करेल
आणि त्यांच्या मनावर सोडेल त्यांना काय बनायचे ते,
पण तरी सुद्धा माझी इच्छा राहील की माझी मुलगी निवडणूक लढवून नगरसेविका बनावी.
काय ना गेल्या 15 दिवसात मी सरकारी कामानिमित्त सतत महानगरपालिकेत येजा करतोय , पण काही केल्या काम काही लवकर होत नाही
सतत काहिनाकाही कमी राहतच.
आणि जरी सर्व कामे पूर्ण झाले तरी शेवटी काम येऊन थांबते ते नगरसेवकांच्या सही , शिक्क्यावर
नगरसेवक जर सही सिक्का देतील किंवा एक फोन करतील तरच तुमचे काम पूर्ण होणार
रहिवासी दाखला पाहिजे असेल तरी नगरसेवक ह्यांचा होकार पाहिजे तुम्ही कितीही वर्षांपासून जरी तेथे राहत असाल तरी नगरसेवक जेव्हा हा करतील तेव्हाच ते ग्राह्य धरल जाईल
घरपट्टी तुमच्या नावावर करायची असेल तुमच्या वडिलांची तरी नगरसेवक ठरवतील तुम्ही खरे वारस आहेत की नाही
ह्याचा अनुभव आज पुन्हा एकदा आला.
म्हणजे एकंदरीत काय तर नगरसेवक हेच आपले सर्वेसर्वा त्यामुळे शक्यतो नगरसेवकांच्या नेहमी जवळपास फिरत जा अधूनमधून त्यांची भेट घेत जा , म्हणजे आपले कुठलेही काम कधीच आढणार नाही.
Wednesday, 12 July 2017
नगरसेवक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment