लहानपणी दूरदर्शनवर महाभारत
बघतांना मी विचार पडत असत
कि,"ध्रतराष्ट्र आंधळा असूनही कसं काय
राज्य करू शकतो..?"
परंतु मोठा झाल्यावर कळाल
कि भारतात फक्त आंधळा, बहीरा,
मुका असलेला माणूसच राज्य करू शकतो..
Sunday, 26 February 2017
राज्यकर्ते
Thursday, 9 February 2017
रिक्षाचालकांचा कहर
#भिवंडीतील_मुजोर_रिक्षाचालक
#भिवंडीतील रिक्षाचालकांची नेहमीच दादागिरी असते त्यात आज मात्र कहरच झाला
भिवंडी डेपोत बस नेत असता मध्ये उभ्या असलेल्या रिक्षावाल्याला रिक्षा बाजुस घेण्यात सांगितले असता
रिक्षाचालकाने बस चालकास बेदम मारहाण केली
त्या मारहाणीत बस चालकाचा मृत्यू झाला
तसे भिवंडी डेपो समोर नेहमीच रिक्षा कुठेही आणि कशाही उभ्या असतात हटकले असता एकत्र येऊन हटकणार्यास दमदाटी करतात
आणि कशीही गलिच्छ भाषा वापरतात
आता तुम्हीच सांगा रिक्षाचालकांच्या या मुजोर वर्तनावर उपाय काय???????
Wednesday, 8 February 2017
ती सध्या काय करते ?
ती सध्या काय करते ?
ती सध्या काय करते ,
काय करणार !! फेब्रुवारी महिना आहे ना !!
म्हणुन विचार करतेय
आज शाळेत / कॉलेज मध्ये गेल्यावर
कोण गुलाब देणार , कोण चॉकलेट
हाच विचार करते
पण हा विचार करता करता , जर कुणाला नाही म्हटलं तर
तो काय करणार !!!
हा सुध्दा विचार करते
मी तर बोलतो ती सध्या काय करते पेक्षा आपण उद्या काय करणार हा विचार करा तो सुध्दा सकारात्मक
कारण प्रत्येक घटना आपल्या मनासारखी होईलच अस नाही.
त्या मुळे हा विचारच नको
ती सध्या काय करते !!!?
हि कुठली पध्दत , वाढदिवसाची
वाढदिवस साजरा करायची हि कुठली पध्दत !!!
काल आमच्या येथे एका मुलाचा वाढदिवस होता , मुलगा मोठा आहे अंदाजे 19 किंवा 20 वर्षाचा असावा
रात्री 10 वाजता वाढदिवस साजरा होत होता
मस्त बाहेर टेबल लावले गेले व टेबलावर केक ठेवण्यात आला , सर्व लहान मोठे मुले त्या ठिकाणी जमा झाले
बर्थडे बॉय ला बोलावण्यात आले तो आला मस्त केक कापला गेला
सर्व लहान मुले खुष होते आता केक खायला भेटेल म्हणून, पण हे काय ?
हे वेगळेच काहीतरी सर्व मुलांनी केक उचलला आणि सरळ त्या बर्थडे बॉय च्या तोंडाला फासला जो येतोय तो हळदी समारंभ प्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरील केक संपुर्ण थोबाड भर फासत होते
आणि बिच्चारे लहान मुले नुसतेच त्या बर्थडे बॉय चा चेहरा पहात होते कारण त्यांना खायला भेटणारा केक असा वाया गेला होता.
Monday, 6 February 2017
अपमान राष्ट्रगीताचा
का हा फरक ?
कालची घटना आहे आमच्या येथील हसीन सिनेमागृहात रईस चित्रपट बघायला माझे दोन मित्र गेले होते.
प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपट चालु होण्याअगोदर राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक आहे
अश्या प्रकारच्या नियमानुसार हसीन सिनेमागृहात हि राष्ट्रगीत लावल गेले
परंतु माझ्या ह्या दोन मित्रांशिवाय इतर कुणीही राष्ट्रगीताचा सन्मानार्थ उभे राहिले नाही उलट बाकीचे प्रेक्षक ह्या दोघांकडे बघत होते की हे का म्हणून उभे राहिले.
हेच प्रेक्षक जेव्हा मल्टिप्लेक्स मध्ये जातात तेव्हा तिथे बरोबर उभे राहतात मग सिंगल स्क्रीन सिनेमागृहात काय होत ह्यांना ?
मल्टिप्लेक्स मध्ये लाजेपोटी उभे राहतात का ?
Sunday, 5 February 2017
पहिले लेखन
म्हणुन मी हातात पेन घेतल.
ठीक आहे , पण लिहावे काय तेच सुचेना,
विषय अनेक आहेत पण एकही जमेना.
मग म्हटलं कशाला नको त्या भानगडीत पडाव,
हे आपलं काम नाही ह्याला इथेच सोडावं.
मग काय सोडल लिहिणं बसलो टिव्ही बघत,
लक्षात आल हे पहिलेच लिखान कदाचीत ह्याच हि होईल स्वागत.
:::::योगेश आंबावले :::
शिवनेरी किल्ला
शिवनेरी गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.
काही माझ्याबद्दल
माझा नेहमी प्रयत्न राहील तुमच्या पर्यन्त काही तरी चांगले विचार मांडण्याचे
तुम्ही मला follow करु शकता
खालील social media networks वर :
१) youtube channel: https://www.youtube.com/user/Yogesha35
२) facebook account : https://www.facebook.com/ambawale.yogesh
धन्यवाद,
योगेश