साऱ्या जगात आहे ज्याची शान,
असा भारत माझा देश खूप महान.
कित्येक ढोंगी,पाखंडी ह्या देशातील घाण आहे,
तरीही मला प्रिय माझा देश,मला ह्याचा अभिमान आहे.
माझ्या देशातील लोकांचा स्वभाव खूप विचित्र आहे,
वागण्यात त्यांच्या नुसतेच बनावटीचे चित्र आहे.
वार्ता करतात नेहमी सत्याच्या पण बोलण्यात मात्र खोटारडेपणा आहे,
म्हणे अहिंसा हाच आपला धर्म आहे,
आणि सतत वाद घालणे हेच त्यांचे कर्म आहे.
भारत माझा देश खरंच खूप महान आहे,
ही गोष्ट वेगळी की काही जण ह्यात घाण आहे.
पर स्त्री माता भगिनी हे नेहमीच असते ह्यांच्या वाणी,
दिसताच एखादी सुंदरी,म्हणे करून गेली दिवानी.
देशात माझ्या येता सण दसरा,रावणाचा पुतळा जाळला जातो,
स्वतःच्या अंतरी झाकून स्वतःची ओळख मात्र कधीच न जाणतो.
देशात माझ्या कित्येकांची देशभक्ती ही अशीच बनाव असते,
वापरून झाला तिरंगा की कचऱ्यात टाकले जाते.
भारत माझा देश खरंच खूप महान आहे,
पण काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांची ह्यात घाण आहे.
राजकारण तर माझ्या देशात खूपच गलिच्छ चालते,
विरोधी पक्ष वाईट म्हणत त्यावर चिखल फेकले जाते.
महत्वाचे म्हणजे असे कृत्य करताना,
स्वतःच्या पक्षात काय चालले हे न पाहिले जाते.
घडता काही वाईट घटना,दोन दिवस वाच्यता होते,
तिसऱ्या दिवशी मात्र काय झाले हे आठवावे लागते.
बलात्कार होता कुठे,निषेध म्हणून पुतळे जाळले जातात,
निषेध करून परतताना मात्र त्यांच्या ही नजरा वळल्या जातात.
मृत्यू होता कुणाचा आम्ही दुःखात सहभागी होतो,
स्मशानातून परतताना मात्र दारूचे दुकान गाठतो.
मरता एखादा नामदार व्यक्ती आम्ही त्याचा मृत्यू सतत उखरत राहतो,
देशाचा पोशिंदा शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो,आम्ही मात्र कानाडोळा करतो.
देशात माझ्या स्त्री पुरुष एक समान कायदा हे बोल नेहमीच बोलले जातात,
येता कुणी स्त्री पुढे, तुमचं काम चुलीजवळ म्हणत हिणवले जातात.